Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, August 27, 2025

नेत्रदानासाठी माळेगाव ग्रामपंचायतीचा सन्मान


वाशिम, दि. २७ ऑगस्ट (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) नेत्रदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल माळेगाव (ता. वाशिम) ग्रामपंचायतीचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील दहा वर्षांत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने तब्बल २४ नेत्रदाने पार पडली असून हा विक्रम जिल्ह्यात आदर्श ठरला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सन्मान सोहळ्याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड आणि नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी माळेगाव ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “नेत्रदानाबाबत ग्रामपंचायतीने समाजात प्रभावी जनजागृती केली असून हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही माळेगावचा आदर्श घ्यावा.”

या यशामागे सरपंच प्रमोद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक दृष्टिहीनांच्या जीवनात प्रकाश परत आला असून या सन्मानामुळे नेत्रदान चळवळीला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

फॉलोअर