Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 29, 2025

मोजणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन. नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे आवाहन



वाशिम, दि. २८ ऑगस्ट (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – भूमि अभिलेख विभागाने मोजणीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. यासाठी ई-मोजणी आवृत्ती-२.० ही आधुनिक ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली असून, नागरिकांना कार्यालयात न जाता घरबसल्या मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे.

या प्रणालीद्वारे अर्ज व मोजणी शुल्काचा भरणा ऑनलाइन करता येतो. तसेच भूकरमापक व मोजणी दिनांक हे संगणकीकृत प्रणालीद्वारे स्वयंचलित निवडले जातात. प्रकरण दाखल झाल्यापासून ते निकाली लागेपर्यंतची संपूर्ण कार्यपद्धती अर्जदार ऑनलाइन पाहू शकतात. मोजणी नकाशा डिजिटल स्वरूपात तयार होऊन कायमस्वरूपी जतन केला जातो. नकाशावर अक्षांश व रेखांश नमूद करून त्याची प्रत अर्जदाराला त्यांच्या प्रवेश क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाते.

अर्ज करण्यासाठी http://115.124.105.28:8069/web/login या संकेतस्थळावर जाऊन नवीन वापरकर्ता नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रवेश-ओळख (लॉगिन आयडी) व गुप्तशब्द (पासवर्ड) मिळेल. त्याद्वारे प्रवेश करून वैयक्तिक माहिती व ७/१२ उताऱ्याच्या आधारे जमिनीची माहिती भरून अर्ज सादर करता येईल.

याबाबत अधिक माहिती किंवा अडचण आल्यास नागरिकांनी ०२०-२५७१२७१२ या सहाय्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे भूमि अभिलेख विभागाने कळविले आहे.

नागरिकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर