Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 8, 2025

लाडकी बहीण पतसंस्था : महिलांसाठी बचत व व्यवसायाचे नवे व्यासपीठमहिला आर्थिक विकास महामंडळाची नवी योजना सुरू होणार



वाशिम,दि.९ ऑगस्ट (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य उपयोग व्हावा, महिलांना बचतीची सवय लागावी आणि उद्योग-व्यवसायासाठी खेळते भांडवल सहज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ‘लाडकी बहीण पतसंस्था’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून ही योजना सुरू होणार आहे.

अनेक महिलांना बँक खाते उघडणे, कर्ज मिळविणे किंवा व्यवसाय सुरू करताना आर्थिक नियोजन करणे कठीण जाते. अशा महिलांसाठी ‘लाडकी बहीण पतसंस्था’ हे एक विश्वासार्ह आणि सोयीचे व्यासपीठ ठरणार आहे. या संस्थेमुळे महिलांना केवळ बचत करण्याची संधीच नाही, तर स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे.

या पतसंस्थेत ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींसोबतच बचत गटातील महिला, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि दिव्यांग महिलांनाही सामावून घेतले जाणार आहे. महिलांच्या बचतीची सवय वाढविणे आणि त्यांना कमी व्याजदरात त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

लाभार्थी महिलांकडून सभासद शुल्क व शेअर्स घेण्यात येणार आहेत. सदस्य झाल्यानंतर महिला आपली रक्कम सुरक्षितपणे जमा करू शकतील, गरजेनुसार कर्ज घेऊ शकतील तसेच बचत, एफडी, आरडी आणि पतसंस्थेतील इतर वित्तीय सुविधा उपभोगू शकतील.

महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर