दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) –
आयुक्त, वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या आदेशान्वये दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित येथे आज (८ ऑगस्ट २०२५) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी केशव मस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत महेंद्र नागसेन मानकर यांची अध्यक्षपदी तर नवनीत रामचंद्र महाजन यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३(अअअ)५(अ) अन्वये झालेल्या निवडणुकीत विविध मतदारसंघातून पुढील संचालक निवडून आले –
- कापूस उत्पादक मागासवर्गीय शेतकरी मतदारसंघ: मिलिंद नागसेन मानकर, मधुकर शिवाजी वाघमारे, उज्वला महेंद्र मानकर, प्रमोद आनंदराव कांबळे, प्रज्ञानंद नागसेन मानकर, पंकज निवृत्ती इंगोले.
- बिगर कापूस उत्पादक मागासवर्गीय शेतकरी मतदारसंघ: विश्वास गोविंदराव भवरे, धर्मराज अभिमन्यू गायकवाड, पवन इंदूवर वाघमारे.
- अमागासवर्गीय बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघ: जुगलकिशोर परसराम अटल.
- महिला राखीव मतदारसंघ: सविता अमोल कानिंदे, ज्योत्स्ना मिलिंद मानकर.
- इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघ: संदीप शांताराम दुधे.
- भटक्या जाती/विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघ: शंकर मोहन राठोड.
- अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदारसंघ: अविनाश देवराव कुलदीपके.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन जनरल मॅनेजर एल. आर. बेहरा आणि निवडणूक निर्णय अधिकारी केशव मस्के यांनी केले. निवडीनंतर जुगलकिशोर अटल व पंकज इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन धर्मराज गायकवाड यांनी केले. या वेळी इलेक्ट्रिक मुख्य अभियंता राजकुमार गुप्ता, अभियंता राहुल ठाकरे, श्वेता पाटील, अमोल कानिंदे, लेखाधिकारी महेश मिरकले, भूषण बागडे, सुनील भावसार, सुमेध मानकर, सिद्धार्थ बर्डे, युक्ता ठाकरे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष महेंद्र मानकर यांचे मार्गदर्शन
"मागासवर्गीयांकडे ना मोठा फंड, ना राजकीय पाठबळ असते. मात्र माझ्या आई-वडिलांच्या समाजप्रेमातून, मोठे भाऊ मिलिंद मानकर यांच्या प्रेरणेने आणि सर्व सभासदांच्या सहकार्याने दिग्रससारख्या छोट्या तालुक्यात १६,४०० चात्यांची सूतगिरणी उभी केली आहे. येत्या काळात ही गिरणी २५,००० चात्यांपर्यंत वाढवू," असे महेंद्र मानकर यांनी अध्यक्षपदी निवडीनंतर सांगितले. "हे यश संघर्षनायक रामदासजी आठवले साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते," असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment