मानोरा, दि. 1सप्टेंबर 2025 (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत गावंडे अंजली सुरेश यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (एम-सेट) 2025 मध्ये इंग्रजी विषयात यश संपादन केले आहे. त्यामुळे त्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी कायमस्वरूपी पात्र ठरल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दिनांक 15 जून 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून निकालानंतर अंजली यांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे.
गावंडे अंजली या गावंडे सुरेश शामराव व गावंडे दुर्गा सुरेश यांची कन्या आहेत. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही परीक्षा दिली होती. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली ही परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
गावंडे अंजली यांच्या या यशामुळे कुटुंबासह नातेवाईक, शिक्षकवर्ग व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक पातळीवर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment