मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) : ऋषिपंचमीच्या पावन दिनानिमित्त दि. २८ ऑगस्ट रोजी खा. संजय देशमुख यांनी मानोरा तालुक्यातील धामणी गावातील अरुणावती नदीकाठी वसलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी खा. देशमुख यांनी मंदिर व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता व १७ ते १८ वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांची झालेली जोपासना कौतुकास्पद असल्याचे सांगितले. "इतक्या वर्षांपासून झाडांचे संगोपन करणे हे निश्चितच अनुकरणीय कार्य आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रा. राजेंद्र म्हातारमारे, तालुकाप्रमुख रवी पवार, उपेंद्र पाटील, गजानन पाटील, राजू ठाकरे, संजय पाटील, राजू खान यांच्यासह सुमित्रा पाटील, योगिता पाटील व महिला मंडळी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment