Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, September 14, 2025

वरोली वाशीयांचा उपयोग नेत्यांकडून केवळ मते पदरात पाडून घेण्यापुरता ? **जीवघेण्या रस्त्यांमुळे नागरिकांचे जीवन झाले नरकमय*

मानोरा :-( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) तालुक्यातील वरोली या गावाला जोडणारा रस्ता पूर्णपणे लयास गेलेला असून या गावातील नागरिकांना जवळ पडत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील मोठे शहर दिग्रस कडे हरसुल मार्गाने जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या वरोली हरसुल हा पाच किलोमीटरचा मार्ग जीवघेण्या अवस्थेत पोहोचलेला असून तीच अवस्था वरोलीपासून तालुक्याच्या ठिकाणी मानोरा या शहरात येण्यासाठी असलेल्या रस्त्याची झाल्याने या गाववाशीयांचा वाली कोणी आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांच्या वतीने प्रशासन व शासनाला विचारल्या जात आहे.
अरुणावती नदीच्या उत्तर तीरावर सेवादास नगर तांडा आणि दक्षिण तीरावर वरोली हे गाव वसलेले असून दोन्ही गावात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त जाती जमाती चे नागरिक प्रामुख्याने निवासाला आहेत. वरोली आणि सेवादास नगर तांडा या दोन्ही गावाची मिळून लोकसंख्या जवळपास ५००० च्या दरम्यान असून या गावातील नागरिकांच्या मताचा  पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडून येणारे लोकप्रतिनिधी केवळ उपयोग करून घेतात आणि निवडणूक झाल्यावर गावातील नागरिकांना अत्यंत गरजेचे असलेला जीवनावश्यक रस्ता सुद्धा येण्या जाण्या लायक तयार करून देत नाहीत अशा व्यथा व संतप्त भावना वरोली आणि सेवादास नगर तांड्यातील नागरिकांकडून मागील एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून शासन व प्रशासनाच्या  निदर्शनास आणून देऊनही झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना उपरोक्त गावातील नागरिकांच्या जीवनमरणाच्या या रस्त्याच्या समस्येविषयी घेणे देणे नसल्याचेच लयास गेलेल्या या रस्त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट झाल्याने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचे तीव्र पडसाद उमटणार असल्याच्या या गावातील व्यथीत नागरिकांच्या बोलण्यावरून पुढे येत आहे.

*वरोली ते हरसुल रस्त्यावर प्रचंड जीव घेणे खड्डे निर्माण झालेले असून दोन्ही बाजूने मोठमोठाले झाडे वाढलेले आहेत. खड्डेमय व कीर्र झाडीतून जीव मुठीत घेऊन दोन्ही गावातील नागरिकांना हरसुल मार्गे डिग्रस कडे प्रवास करावा लागतो. हरसुल ते दिग्रस दारव्हा फाट्यापर्यंत रस्ता चांगला बांधण्यात आला असून मानोरा तालुका हद्दीमध्ये मात्र हा रस्ता धोकादायक ठरलेला आहे. तीच अवस्था वरोली ते कारखेडा विठोली पर्यंत असून सेवादास नगर आणि वरोली गावातील नागरिकांची ही समस्या सुटणार की नाही याबाबत लोकांना आता चिंता सतवायला लागलेली आहे.


No comments:

Post a Comment

फॉलोअर