मनोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )
----------०००--------
आदिवासी बंजारा समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी आता आरपारची लढाई पेटली असुन गेल्या ७७ वर्षांपासून सत्ता आणि सत्ताधाऱ्यांनी बंजारा व तत्सम जमातीवर अन्यायाचा डोंगर रचला आहे. पण आता हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास समाज गप्प बसणार नाही.
आम्ही आदिवासी आहोत, आम्ही मूलनिवासी आहोत याचे कोनाकड़ेही नसेल असे शेकडो पुरावे असतानांही या जमातींना गंडविन्यात आले. आमचे हक्क हिरावून घेऊन वंचित ठेवले गेले.;आमचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा याची कोणालाही फिकीर नव्हती. आता मात्र हे अन्यायाचे ओझे आम्ही झेलणार नाही. यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने रणसिंग फुकले गेले असुन मानोरा येथे संजय महाराज यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बुधवार 17 सप्टेंबरच्या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बंजारा आरक्षण कृती समीतीच्या वतीने नामा बंजारा यांनी केले आहे.
मानोरा येथे होणारा मोर्चा वर्तमान अनुसूचित जमातीं विरुद्ध नसून बंजारा व तत्सम जमातीं हया ट्राइब आहेत हे ऐतिहासिक सत्य सिद्ध करण्यासाठी आहे असे स्पस्टीकरण सुद्धा नामा बंजारा यांनी दिले.
वसंतराव नाइक यांनी सी पी एंड बेरार स्टेट मध्ये केलेली तरतूद, हैद्राबाद गैज़ेट मध्ये आढळून आलेल्या नोंदी, संत रामराव महाराज यांनी वारंवार केलेले अथक प्रयत्न या बाबी समाज विसरला नसून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखोंच्या संख्येने बंजारा समाज मोर्चात उतरून आपला अधिकार हिसकावून घेईल यात शंका नाही असे संजय महाराज यांनी सांगितले. हा मोर्चा फक्त आंदोलन नाही, हा आमच्या अस्तित्वाचा रणघोष आहे. आपल्या संविधानिक हक्कांसाठी पेटून उठा आणि मोर्चात सामील व्हा असे आवाहन संजय महाराज यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment