Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, September 19, 2025

चिखलमय रस्त्या वरून चिखली व वरोली वाशीयांनी मार्गक्रमण कसे करावे. ? सेवा पंधरवाडा दरम्यान दोन्ही गावच्या नागरिकांचा प्रशासनाला सवाल.


मानोरा:-- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) तालुक्यातील महत्त्वाकांक्षी पोहरादेवी, पंचाळाफाटा चिखली वरोली हा ग्रामीण मार्ग चिखली ते सोयजनापर्यंत गुडघाभर चिखलानी माखलेला असल्याने देशाचे यशस्वी पंतप्रधान यांच्या जन्मोत्सवानिमित्त सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात तरी या दुर्लक्षित रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची किमान डागडूजी तरी करावी अशी अपेक्षा चिखली आणि वरोली येथील नागरिक व शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वरोली आणि चिखली येथील नागरिकांसाठी ग्रामीण मार्ग क्रमांक ४६ ची निर्मिती करण्यात आलेली असून चिखली ते वरोली जवळपास पाच किलोमीटरचा रस्ता देखभाल व दुरुस्ती अभावी पूर्णपणे लयास गेलेला असल्याने या रस्त्याने वाहने नेने तर सोडा पायी चालणे सुद्धा अवघड झालेले आहे.
चिखली ते वरोली दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात सुपीक शेत शिवार असून या शेतशिवारात खरीप व रब्बी हंगामात येजा करण्यासाठी हा एकमेव खड्डेमय रस्ता उपलब्ध आहे.
निर्मितीनंतर या रस्त्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केलेले असून वाट लागलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून खडीकरण करण्यात येण्याची मागणी दोन्ही गावच्या गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
###
*स्वातंत्र्योत्तर अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या देशातील नागरिक व शेतकऱ्यांना किमान पायाभूत सेवा मिळू नये यापेक्षा दुर्दैवी बाब  कुठलीही असू शकत नाही हेच चिखली वरोली ,तसेच चिखली ते घोगारार पांदण स्त्यावरून सिद्ध होते..
 नामा बंजारा,महासचिव,अखिल भारतीय तांडा सुधार समिती महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment

फॉलोअर