Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, September 27, 2025

संत सेवालाल महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पं.दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी . विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग.

मानोरा--मानवी जीवनास समृद्ध करणारी भारतीय संस्कृती ही चिरंतन,आदी-अनादी-अनंत असून,एकात्म मानव दर्शन हे सर्व समावेशक जीवनव्यापी विचाराचे प्रगटीकरण असुन ''पंडित दीनदयाल उपाध्याय हे एकात्म मानव दर्शन सिद्धांताचे आद्य प्रणेते आहे."असे प्रदीपादन प्रा.सुनिल सपकाळ मंगरुळनाथ यांनी केले.
संत सेवालाल महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मानोरा येथे मा.मंगल प्रभात लोढा कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता मंत्री यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने आयोजित 'एकात्म मानव दर्शन' या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
त्यांनी आपल्या प्रबोधनातून पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचे जीवनचरित्र,त्यांना अपेक्षित असणारा 'एकात्म मानव दर्शन सिद्धांत',त्याचप्रमाणे त्यांनी जपलेली जीवन मूल्ये  याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जोशी सर होते.त्याचप्रमाणे व्यासपीठावर समिती सदस्य श्री.दीक्षित, शिक्षक प्रशांत पाचपोर,रोठे,,ठाकूर,उपस्थित होते.
सर्वप्रथम पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विविध ट्रेडचे अनेक प्रशिक्षणार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ---

No comments:

Post a Comment

फॉलोअर