Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, September 27, 2025

अधिकार नसताना पदभरती प्रक्रिया; अल्पसंख्याक दर्जा संदर्भात मंत्रालयात सुनावणी सुरू



वाशिम : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
कोणतेही अधिकार नसताना शासनाची व अन्य विभागांची दिशाभूल करून पदभरती प्रक्रिया राबवण्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला आहे. श्री सेवादास शिक्षण संस्था, पाळोदी संचालित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा वाद सुरू असून हे प्रकरण न्यायालयासह संबंधित विभागांकडे प्रलंबित आहे.

संस्थेचा साधा सदस्य नसतानाही भारत चंदुसिंग चव्हाण यांनी स्वतःला अध्यक्ष म्हणून दाखवत अल्पसंख्याक विभागाकडून संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी अर्ज केला. या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाची व नोकरी इच्छुक उमेदवारांची दिशाभूल करून भरतीची जाहिरात काढल्यामुळे मोठा घोळ व देवाणघेवाणीची चर्चा रंगली आहे.

या प्रकरणाबाबत फिर्यादी प्रवीण जाधव यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. तसेच संस्थेला अल्पसंख्याकाचा दर्जा देऊ नये, यासाठी मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाकडे कागदपत्रे सादर केली असून २५ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी घेण्यात आली. यापूर्वीही संबंधितांना सुनावणीकरिता नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.

यापूर्वी भरतीबंदी काळात बोगस दस्तावेज तयार करून नियुक्त्या करणे, शालार्थ आयडी फसवणूक आदी प्रकारांत भारत चंदुसिंग चव्हाण व इतरांविरुद्ध  (असेगाव) पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR क्र. 283/2022) नोंदवण्यात आला असून चार्जशीट क्र. 19/2025 (IPC 420, 465, 467, 468, 471 r/w 34) न्यायालयात सादर केली आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या अटकपूर्व जामिनावर आहेत.

परवानगी नसताना बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. इतका सावळा गोंधळ सुरू असूनही शिक्षण खातं गप्प का आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाकडे वाशिम जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले असून पुढील कारवाई काय होते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर