वाशिम : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
गावकामगार पोलीस पाटील संघटना, वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी वाशिम येथील वाटाणे मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
बैठकीस राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव कोलते पाटील, उपाध्यक्ष मा. अरुणजी बोडके पाटील, उपाध्यक्ष मा. जब्बारभाई पठाण पाटील, राज्य कार्यकारी अध्यक्ष मा. बळवंतराव काळे पाटील, राज्य सहसचिव मा. गोरख टेमकर पाटील, विदर्भ अध्यक्ष मा. विजय घाडगे पाटील, संस्थापक सदस्य मा. ज्ञानोबा काटकर (परभणी) व मा. संतोषजी पवार पाटील तसेच राज्य कोर कमिटीचे मान्यवर उपस्थित होते.
तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामद्रे पाटील, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कारभारी निभोटे पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष रितेशजी दुरतकर पाटील, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकरजी साठवणे पाटील, गडचिरोली जिल्हाध्यक्ष योगेश नाकाडे पाटील, गोंदिया जिल्हाध्यक्ष . राजेशजी बनसोड पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रविशंकर ढोले पाटील, परभणी जिल्हाध्यक्ष राहुलजी डोंगरे पाटील, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोकराव थेटे पाटील, हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गीते पाटील यांच्यासह राज्यातील विविध जिल्हाध्यक्ष, सचिव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत राज्याध्यक्षांनी अमरावती विभागीय उपाध्यक्ष म्हणून शामराव राठोड पाटील व अमरावती विभागीय सचिव म्हणून वासुदेव सोनोने यांच्या निवडीची घोषणा केली.
यावेळी वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना राज्याध्यक्ष कोलते पाटील यांनी संजय महाले पाटील यांची वाशिम जिल्हाध्यक्षपदी, जिल्हा सचिव म्हणून अनिल खीराडे पाटील, उपाध्यक्ष म्हणून संजू गाढे पाटील, मा. श्री. सुनील मुळे पाटील, सुरेश राठोड पाटील व पांडुरंग नागरे, कार्यकारी अध्यक्ष निलेश ठाकरे, कार्याध्यक्ष माणिक खराटे पाटील यांची निवड झाल्याची माहिती दिली.
वाशिम जिल्हा महिला आघाडीत अध्यक्षा सौ. ज्योतीताई शिंदे, उपाध्यक्षा वनिताताई खरसडे व सचिव सौ. सविताताई पवार यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य पोलीस पाटील बंधू-भगिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment