पोहरादेवी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क.):
तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील आदर्श व अभ्यासू व्यक्तिमत्त्व, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी, संत सेवालाल महाराजांचे बंधू संत पुरा नायक यांचे वंशज, अत्यंत हुशार व नव नियुक्त विश्वस्त – श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट, पोहरादेवी
स्व. विलासदादा लालसिंग राठोड (पोहरादेवी)
यांचे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
स्व. विलासदादा राठोड यांना मानणारा फार मोठा परिवार असून ते सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असायचे. त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना माता जगदंबा व संत सेवालाल महाराज चरणी करण्यात येत आहे.
बंजारा परंपरेनुसार त्यांचा पाचवीचा कार्यक्रम दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी चिंचोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment