दिग्रस (सुरेश चिरडे) – शहरात नायलॉन मांजावर बंदी असतानाही पतंग उडविण्यासाठी त्याचाच वापर सुरूच असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या एका घटनेत सहाय्यक शिक्षिका जखमी झाल्याने या विषयावर पुन्हा चर्चा रंगली आहे.
सारीका पाटील वडे (सहाय्यक शिक्षिका, जि.प. प्रा. शाळा धानोरा बु.) या शाळा सुटल्यावर आपल्या निवासस्थानी दुचाकीने जात असताना आर्णी बायपास–दिग्रस स्मशानभूमी परिसरात पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या काही युवकांचा मांजा त्यांच्या गळ्याला लागला. गळ्याभोवती स्कार्फ असूनही तो फाटला आणि मांजामुळे त्यांच्या गळ्याला जखम झाली.
शहरात नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविण्याचा प्रकार सुरूच असून यावर तात्काळ आळा घालावा, तसेच नायलॉन मांजा विक्रेते व वापरकर्त्यांवर कडक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या घटनेबाबत २६ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती श्रीमती पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment