मानोरा :(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
गेल्या अनेक दिवसांपासून अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मिळावे, अशी मागणी होत होती. राज्य सरकारने १ ऑगस्ट २०२५ पासून वाढीव टप्पा अनुदान लागू करण्याचा शासन आदेश जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष पत्रे शाळांना मिळाली नव्हती.
मात्र २५ व २६ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयामार्फत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना वाढीव टप्पा अनुदानाची पत्रे वाटप करण्यात आली. यामुळे अंशतः अनुदानित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ही पत्रे शिक्षणाधिकारी सौ. मंगला धुपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी विना अनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय संघटक उपेंद्र बाबाराव पाटील, मुख्याध्यापक संघाचे बाळासाहेब गोटे, विनोद नरवाडे, गणेश भाकरे, जगदीश गोरे, श्रीकांत जोशी, संजय ठाकरे, प्रसेनजीत भगत, संतोष गावंडे, सोनू अंभोरे, साहेबराव जाधव, नितीन मनवर, अंकुश शेंडोकार, शफी सर, सतीश गायधनी, राजेश खाडे, संतोष गिऱ्हे, काशिनाथ लांडगे, बाजड, गनी, जाधव, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment