Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, September 26, 2025

ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे यांची राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड; अमरावती विभागात आनंदाचे वातावरण


वाशिम : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह व अमरावती विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे यांची महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमरावती विभागातील वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील ग्रंथालय क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्रभाकरराव घुगे यांनी संपूर्ण आयुष्य ग्रंथालय चळवळीसाठी वाहिले असून, गेली ३५ वर्षे ते या क्षेत्रात जोमाने कार्यरत आहेत. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या गुणांमुळे ते अभ्यासू व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. वाशिम जिल्ह्यात जिल्हा ग्रंथालय संघ स्थापन करून “गाव तिथे ग्रंथालय” ही चळवळ सुरू करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता मिळवून देणे, ग्रंथालयांचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, साधनसामुग्री उपलब्ध करून देणे, ग्रंथपालन प्रशिक्षण सुरू करणे, तसेच काळानुरूप नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिला आहे.
ग्रंथालय सेवेत सुधारणा, कार्यशाळा, शिबिरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रामीण व शहरी भागात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी उपक्रम, ग्रंथालय अनुदानवाढ, कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवा-शर्ती लागू करणे यांसाठी त्यांनी नागपूर, मुंबई येथे मोर्चे, धरणे व निवेदनांद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.

या व्यापक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड केली आहे. राज्य ग्रंथालय परिषदेच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथालयांचे प्रलंबित प्रश्न शासनासमोर मांडून चळवळीला नवी दिशा देण्याचा आणि ग्रंथालय चालकांच्या समस्या सोडविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या या निवडीचे श्रेय त्यांनी अमरावती विभागातील सर्व ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर