भुली (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) :
जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवडा मिशन मोहिमेअंतर्गत ग्रामस्वच्छता महिला मंडळ भुली यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने “जागर स्वच्छतेचा” हा उपक्रम राबविला.
गेल्या नऊ दिवसांपासून महिला मंडळातील कार्यकर्त्यांनी भुली गावासह आसपासच्या तीर्थक्षेत्रातील देवी मंदिर परिसर, ग्रामातील मंदिरे, प्रमुख रस्ते आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून भाविक भक्तांना स्वच्छतेचा पवित्र संदेश दिला.
या उपक्रमात सुमारे 60 ते 70 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गव्हा, तरनोळी, डोंगरखेडा, डोंगरगाव, अभयखेडा, कारखेडा, विठोली अशा विविध गावांमध्ये जाऊन महिला मंडळाने स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सेवेचे व्रत जोपासत या मंडळाने समाजात स्वच्छतेविषयी जनजागृती करून प्रेरणा निर्माण केली. भविष्यात स्वच्छ व सुंदर गाव, तसेच समाजाचे आरोग्यदायी भवितव्य घडविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment