Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, October 1, 2025

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे; राज्य मागासवर्ग आयोगाला निवेदन

पुणे,दि.३०- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)बंजारा जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे आणि बंजारा समाज मागासलेपणाचे सर्व निकष पूर्ण करते.राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वंकष अभ्यास करून राज्य शासनाकडे शिफारस करावी,अशा आशयाचे निवेदन बंजारा आरक्षण कृती समितीने दिले आहे.
  राज्य मागासवर्ग आयोग आज पुण्यात आले होते.आयोगाचे अध्यक्ष न्या.सुनील शुक्रे, आयोगाचे सदस्य जोतीराम चव्हाण व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
   बंजारा आरक्षण कृती समितीचे सदस्य बळीराम राठोड व मोहन राठोड यांनी आज निवेदन देऊन बंजारा समाज व अन्य १३ जातींना १८७१ मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून कायदा लावला.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी १९५२ मध्ये या समाजाला मुक्त केले.
   हा समाज सध्या भटक्या-विमक्त संवर्गात आहे.मात्र हा समाज अनुसूचित जमातीचे खरे हकदार आहेत. हैदराबाद गँझेटिअरमध्ये देखिल या समाजाची अँबार्जिनल ट्राईब म्हणून नोंद आहे. या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी भव्य आंदोलन व मोर्चे निघत असल्याचे आयोगाला अवगत केले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर