Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, October 16, 2025

घरकुल लाभार्थ्यांना मजुरीचे पैसे न मिळाल्याने तक्रारींचा भडका



मानोरा : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मजुरीचे पैसे न मिळाल्याने तालुक्यात तीव्र असंतोष पसरला आहे. यासंदर्भात लाभार्थी प्रवीण राठोड यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.

प्रवीण राठोड यांनी घरकुलासाठी एकूण १८ मस्टर टाकलेले असून फक्त ३ मस्टरचे पैसेच त्यांच्या खात्यावर जमा झाले, बाकीच्या मजुरांचे पैसे अनेक महिन्यांपासून थांबलेले आहेत. या गंभीर तक्रारीवर वरिष्ठांनी प्रकरण गटविकास अधिकारी मानोरा यांच्या कडे वर्ग केले असून आता या प्रकरणी गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घरकुलाचे मजुरीचे पैसे न मिळणे ही समस्या फक्त एका लाभार्थ्याची नसून तालुक्यातील बहुतेक लाभार्थ्यांची हीच व्यथा असल्याचे दिसून आले आहे. गावोगाव रोजगार सेवकांकडून पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असून, अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की – “९० दिवस पूर्ण झाले आता तुम्हाला मस्टर टाकता येणार नाही, आमच्या परीने आम्ही टाकतो. नाहीतर पैसे मिळणार नाहीत, कुठेही जा” असे रोजगार सेवक सांगतात. त्यामुळे गरीब व कष्टकरी लाभार्थी हतबल झाले आहेत.

स्वतः कष्ट करून घरकुल उभारत असताना मजुरीचे पैसे खात्यात जमा न होता महिनोंमहिने अडकून पडले, तर मग हे पैसे इतरांच्या खात्यात कसे जात आहेत, असा प्रश्नही लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

या गंभीर प्रकरणी कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मालाला यांनी वैयक्तिक लक्ष घालून पारदर्शकता राखावी व पीडितांना न्याय द्यावा, अशी लाभार्थ्यांकडून मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर