Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, October 16, 2025

“मजुरी न मिळाल्याने दिवाळी काळी” – घरकुल लाभार्थ्यांचा आक्रोश


मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारताना लाभार्थ्यांना मजुरीचे पैसे मिळत नसल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “स्वतः काम केले, स्वतः घाम गाळला… तरी मजुरीचे पैसे मिळत नाहीत. दिवाळीसारख्या सणाला हक्काचे पैसे हातात नसतील तर या योजनेचा उपयोग तरी कशासाठी?” असा जळजळीत सवाल त्रस्त लाभार्थ्यांकडून केला जात आहे.

तक्रारदार प्रवीण राठोड आमदरी यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरकुलासाठी तब्बल १८ मस्टर टाकले असतानाही फक्त ३ मस्टरचेच पैसे खात्यावर जमा झाले. बाकी मजुरीचे पैसे महिनोंमहिने प्रलंबित आहेत.

त्याहूनही गंभीर बाब म्हणजे काही रोजगार सेवक पारदर्शक काम न करता आपल्या स्वतःच्या कुटुंबीयांची नावे मस्टरमध्ये टाकून मजुरीचे पैसे घेतात, असा आरोपही करण्यात आला आहे. खरे लाभार्थी मात्र आपले पैसे मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीपासून तालुक्यापर्यंत चकरा मारत आहेत.

याप्रकरणी तक्रारदार प्रवीण राठोड आमदरी यांनी स्पष्ट मागणी केली आहे की – घरकुलाच्या मजुरीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची यंत्रणा राबवली, तर भ्रष्टाचाराला आळा बसेल.

या गंभीर गैरव्यवहाराकडे आता गटविकास अधिकारी मानोरा काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गरीब कष्टकरी लाभार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांना दिवाळीच्या आधी न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर