Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, October 18, 2025

भाजपा मानोरा मंडळ पदाधिकाऱ्यांची दिवाळी मिलन नियोजन बैठक उत्साहात संपन्न

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस )
आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी शनिवार, विश्रामगृह मानोरा येथे भारतीय जनता पक्ष तालुका मंडळाची दिवाळी मिलन नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका मंडळ अध्यक्ष अरविंद इंगोले होते.

बैठकीस तालुका सरचिटणीस राजेंद्र देशमुख, प्रवीण धोटे, जिल्हा पदाधिकारी डॉ. अविनाश लोथे, डॉ. सुहास देशमुख, अनुसूचित जमाती आघाडी जिल्हाध्यक्ष रवी पखमोडे, महिला युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सीमाताई राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्याम डोळस, अनुसूचित जाती-जमाती आघाडी तालुकाध्यक्ष मनोज खडसे, किसान आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर धामणीकर, जिल्हा पदाधिकारी डॉ. अरविंद यावलकर, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष हरीश नवहाल, अनुसूचित जमाती आघाडीचे नामदेव टाले, मीडिया प्रमुख प्रताप डांगे, कामगार आघाडी प्रमुख प्रमुख ठाकरे, तसेच दिलीप चव्हाण, विजय लाला जैस्वाल, गौरव पुसतकर, अमित लोखंडे, राजेश राठोड सरपंच, प्रमोद सावंत, डॉ. शशिकांत पवार, माणिक चव्हाण, आकाश चव्हाण, रवी मासूदकर, गोपाल जाधव, उमेश इंगोले, अमित तुळजापुरे, राजीव ससाने, निलेश चौधरी, शंकर महाराज, नागोराव घोरसडे, शंकर देवकर, प्रवीण खिराडे, अतुल राऊत, संजय गावंडे आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत निर्णय घेण्यात आला की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी मिलन कार्यक्रम दिवाळीनंतर पिंपरी येथील हनुमान मंदिरावर उत्साहात साजरा करण्यात येईल. यासाठी शक्ती केंद्रप्रमुख, भाजपा अधिकारी, आमंत्रित मान्यवर, सदस्य तसेच विविध हिंदू संघटनांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

तसेच दिवाळी हा सण प्रत्येक मंडळामध्ये, विशेषत: आदिवासी-पारधी व मागासवर्गीय वस्त्यांवर साजरा करण्याचे ठरले. बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. याशिवाय उर्वरित बुथप्रमुख नियुक्त्या लवकरच पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले.

 या बैठकीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर