Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, October 21, 2025

दीपोत्सव २०२५. वाशिममध्ये उजळणार दिवाळीचा सुरेल सांस्कृतिक सोहळा


वाशिम,दि.२१ ऑक्टोबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर आणि संगीतातून उजळण्यासाठी “दीपोत्सव २०२५” हा बहारदार गीत-संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता विठ्ठलवाडी सभागृह, जुनी नगरपरिषद रोड, वाशिम येथे पार पडणार आहे.

हा उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री  ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि  किरण कुलकर्णी (भा.प्र.से.) सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.

कार्यक्रमात प्रसिद्ध गायक मयुर सुकाळे (मुंबई), कुणाल वराळे (छ. संभाजीनगर), प्रसिद्ध गायिका प्रतीक्षा कांबळे, तसेच स्थानिक कलाकार संतोष खडसे यांचा नृत्य समूह आपली कला सादर करणार आहेत.

दिवाळी निमित्ताने यंदा राज्यातील दहा ठिकाणी “दिवाळी पहाट” या स्वर-उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, वाशिम येथे होणारा “दीपोत्सव २०२५” हा त्यातील एक आकर्षक टप्पा ठरणार आहे.

या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, मराठी गीत-संगीत आणि अभंगवाणीच्या सुरेल सादरीकरणांनी रसिकांना एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवता येणार आहे.

वाशिम येथील हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून दिवाळीचा हा सांस्कृतिक सोहळा अनुभवावा, असे आवाहन विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर