चंद्रपूर : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
विजया दशमी, गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन या शुभ पर्वांच्या निमित्ताने नागपूर येथील धरमपेठमधील वसंतराव नाईक सभागृहात यहोव यिरे फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात चंद्रपूरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व अशोक जाधव सर यांना 225 वा आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रातील 75 नामवंत व्यक्तींना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री एलिना तुतेजा, सिमरन आहुजा, तसेच अशोक दिगांबर जाधव (राष्ट्रीय महासचिव, ऑल इंडिया बंजारा टायगर्स) व डी. के. आरीकर (संपादक) उपस्थित होते.
या सोहळ्यात प्रसिद्ध गायक डॉ. सुनील चव्हाण यांनी स्त्री व पुरुष आवाजात दिलखुलास गायन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रमेश बोरकुठे (संस्थापक, सी.ओ.) यांनी केले होते. आभार प्रदर्शन एलिना बोरकुठे यांनी केले, तर अश्विनी पुरी यांनी सुबक शैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची दाद मिळवली.
No comments:
Post a Comment