Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, October 10, 2025

उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी चांगले मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे डॉ.अनिल कावरखे. जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

वाशिम, दि. १० ऑक्टोबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा)
 उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी चांगले मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. जगभरातील प्रत्येक आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त असून, त्याचा थेट परिणाम शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले.
    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम यांच्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीची  “आपत्ती आणि आपातकालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता”ही थीम होती.यावेळी श्री कावरखे बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय परिचारिका महाविद्यालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिन मेश्राम आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्याहस्ते फित कापून संपन्न झाले.

डॉ. सतिन मेश्राम यांनी सांगितले की, मानसिक आजार हा कलंक नसून वेळेत मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मानसोपचार तज्ञ डॉ. राहुल डोंगरे यांनी सकारात्मक विचारसरणी आणि व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. स्वप्निल करवंदे यांनी मानसिक आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धती याबाबत माहिती दिली.
डॉ. श्वेता मोरवाल यांनी किशोरवयीन मुले-मुली व तरुणांमध्ये वाढत्या आत्महत्यांच्या प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर ताणतणाव, आत्महत्या सुचक लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन केले.
तर डॉ. मंगेश भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांचे ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मनोरोग तज्ञ नर्सिंग ऑफिसर राहुल कसादे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता प्रियंका वलके यांनी केले.

या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, भुलतज्ञ डॉ. अविनाश झरे, समोपदेष्टा श्रीमती शरयू क्षीरसागर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या स्नेहल महाल्ले, पाठ्यनिर्देशक कल्पना ढोरे, मनोज गावंडे, पीएचएन अनिता साबळे, रुपाली साबळे, अमोल राठोड, अश्विनी भोंडणे, रामदास मापारी, तसेच डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रॅमचा संपूर्ण कार्यसंघ व शासकीय वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर