Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, October 10, 2025

उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना कंत्राटी शिक्षकांचे निवेदन. दिवाळीपूर्वी मानधन अदा करा अशी आर्त मागणी

मानोरा – (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

मानोरा तालुक्यातील सर्व CHB कंत्राटी शिक्षकांचे तब्बल दोन वर्षांपासूनचे मानधन रखडलेले असून त्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपूर्वी मानधन अदा करावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पाठविण्यात आले आहे.

कंत्राटी शिक्षकांनी निवेदनात म्हटले आहे की, शासन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देते; मात्र CHB शिक्षकांना दोन वर्षांपासून एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

शाळांमध्ये तोकड्या मानधनावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या शिक्षकांना अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मानधनाचा प्रश्न निकाली काढावा आणि कंत्राटी शिक्षकांची दिवाळी गोड करावी, अशी आर्त मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर प्रा. अनिल चव्हाण, प्रा. हर्षल निंबाळकर, कृष्णा गावंडे, प्रा. शिवम ठाकरे, प्रा. आशिष भगत, प्रा. स्वरूपा राठोड, प्रा. भीमराव राठोड, प्रा. वैभव ठाकरे यांच्यासह इतर सर्व कंत्राटी शिक्षकांच्या सह्या आहेत

No comments:

Post a Comment

फॉलोअर