Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, October 31, 2025

तळप जिल्हा परिषद सर्कल वाशिम जिल्ह्यात हॉट सीट ठरण्याची शक्यता. तालुक्या बाहेरच्या उमेदवाराचे फ्लेक्स लागल्याने चर्चांना उधाण.


मानोरा :--( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील एका गावात जिल्हास्तरीय नेत्याच्या निवडणुकीतील भावी उमेदवार संदर्भात लक्षवेधी बॅनर लागल्याने सर्कलसह संपूर्ण तालुक्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहयला सुरुवात झाल्याच्या चर्चा रंगत आहेत.
 तळप ह्या सर्कलमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या महिला उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावर विराजमान होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या उलथापालथी होऊन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात अशा अनेक कोलांटऊड्या मारल्या गेल्याने व राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षाच्या महिला उमेदवार निवडून आल्यावर सध्याच्या विधिमंडळ सदस्या सोबत जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या तत्कालीन महिला सदस्याचे यजमान व्यासपीठावर सातत्याने नजरेत येत असल्याने ते सत्ताधारी पक्षात गेल्याच्या चर्चा सर्कलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये रंगत आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गतवेळी येथे सदस्य निवडून आल्याने यावेळी सुद्धा नैसर्गिक न्यायाने या सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मजबूत दावा दाखल करण्यात येण्याच्या चर्चा सुद्धा जोरदार रंगत आहेत. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी तळप या जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवावी यासाठी सर्कल व तालुक्यातील काही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्षाची मानधरनी केल्याची विश्वसनीय माहिती सुद्धा तालुक्यातील झळकत असलेल्या पक्षाच्या बॅनर वरून पक्की होत आहे. 
जिल्हा परिषद सर्कलचे भावी उमेदवार असा स्पष्ट उल्लेख केलेला फ्लेक्स विठोली येथील कारखेडा रस्त्यावर लावण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकारणात काही लोकांचे दादा असलेले व्यक्तिमत्व या सर्कलमध्ये उभे राहणार अशा चर्चा जोर धरत असून तसे घडल्यास या सर्कल मध्ये यापूर्वी निवडून आलेले मात्र आता दुसरीकडेच नजरेत येत असलेल्या चे काय ? असा सवाल सुद्धा या बॅनरच्या निमित्याने चर्चिला जात आहे.

*विठोली येथे ज्या राजकीय पुढाऱ्याचे फ्लेक्स लावून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे त्यांच्या विरोधात सुद्धा तोडीस तोड उमेदवार येथे विरोधी पक्षाकडून उतरविला जाईल यामध्ये सुद्धा दुमत नसल्याने ही लढाई एकतर्फी निश्चितच होणार नाही याचीही चर्चा सुद्धा या फ्लेक्स वरून निवडणुकीपूर्वीच रंगायला लागलेली आहे.*

No comments:

Post a Comment

फॉलोअर