Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, October 29, 2025

घराचा दरवाजा जाळून दिग्रस येथे घरफोडी – ३ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास

दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्स्प्रेस न्यूज नेटवर्क ) : दिग्रस शहरातील समर्थ सिटी परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरीची घटना घडवून आणली आहे. जवळच्या हत्याराने दरवाजा तुटत नाही हे लक्षात आल्याने चोरट्यांनी थेट घराचा दरवाजा जाळून आत प्रवेश केला व सोने, चांदीच्या वस्तूसह रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सविस्तर वृत्त असे की, अमोल पुंडलीक मोहिते पाटील (रा. समर्थ सिटी, दिग्रस) हे दिवाळी निमित्ताने आपल्या कुटुंबासह मूळ गावी सावळी येथे गेले होते. रात्री त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा न तुटल्याने त्यांनी दरवाजा जाळून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटे उघडून त्यांनी सुमारे २० ग्रॅम सोने, ३३ हजार रुपये किमतीचा घरगुती सामान व ९६ हजार रुपयांची रोख रक्कम असा मिळून एकूण ३ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरी केला.

या घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. या धाडसी चोरीमुळे समर्थ सिटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर