Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, October 15, 2025

हॅप्पी फेसेस स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न. कुमारी हिर बागरेचा हिने वृत्तपत्राचे रूप धारण करून सर्वांचे लक्ष वेधले

वाशिम : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
वाशिम शहरातील नामांकित हॅप्पी फेसेस स्कूलमध्ये आज रंगतदार फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी हिर शैलेंद्र बागरेचा हिने आकर्षक वृत्तपत्राचे रूप धारण करून विशेष दाद मिळविली.

लहानग्यांनी विविध वेषभूषा करून आपले कौशल्य सादर केले. हिर हिने वृत्तपत्राचे वेश परिधान करत समाजात वृत्तपत्राचे महत्त्व अधोरेखित केले. "वृत्तपत्र हे समाजाचे आरसे आहे, ते लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे," असा संदेश आपल्या वेशभूषेतून तिने प्रकट केला.

या उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्जनशीलतेला व आत्मविश्वासाला वाव मिळाला. कार्यक्रमाला पालकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांनी हिरच्या संकल्पनेचे व सादरीकरणाचे अभिनंदन केले.

अशा उपक्रमातून मुलांमध्ये सामाजिक जाणीव, वक्तृत्वकौशल्य व कलागुणांना प्रोत्साहन मिळते, असे शाळेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर