Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, October 14, 2025

जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्धहरकती अथवा सूचना सादर करण्याची अंतिम तारीख


वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अन्वये वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कळविले की, या प्रारूप अधिसूचनेमध्ये वाशिम जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागांची तसेच पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची एकूण सदस्यसंख्या व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि स्त्रियांसाठी राखीव विभागांचे तपशील नमूद करण्यात आले आहेत.

ही अधिसूचना पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे :
१. जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर
२. जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर
३. तहसिलदार कार्यालये — कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड व वाशिम
४. पंचायत समिती कार्यालये — कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड व वाशिम

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रारूप आरक्षणावर हरकती अथवा सूचना सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
संबंधितांनी आपली लेखी हरकत अथवा सूचना जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या कार्यालयात निर्दिष्ट तारखेपर्यंत सादर करावी. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत,असेही नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर