मानोरा :--- तालुक्यातील ज्या नागरिकांच्या डोक्यावर छत नाही अशा पात्र व गरजू नागरिकांना घरे मिळावीत यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान सगळ्या कागदपत्रांची व प्रस्तावांची पूर्तता करूनही मिळत नसल्याने लाभार्थ्यांना प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असून घरकुल योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना तातडीने पहिला, दुसरा व अंतिम अनुदानाचा हप्ता मिळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्ह्याच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना माजी पंचायत समिती सदस्याच्या वतीने देण्यात आले आहे.
तालुक्यातील शहर नपं आणि ग्रामीण भागातील जवळपास सर्व ग्रापं हद्दीतील पात्र नागरिकांना प्रधान मंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि मोदी आवास योजनेअंतर्गत हजारो घरकुलांची मंजुरात मिळालेली आहे या घरकुलांचे हप्ते मिळून घराचे बांधकाम करता यावे यासाठी शहर व तालुक्यात नागरिकांनी आवश्यक असलेले केवायसी व बँक खाते पुस्तक व्हेरिफाय करून सुद्धा किमान असंख्य लाभार्थ्यांना पहिला हप्तासुद्धा प्राप्त झालेला नाही ही वास्तविकता आहे.
(*घरकुलाचा पहिला, दुसरा व तिसरा मंजूर हप्ता वितरित करण्यासाठी संबंधित अभियंता उघड लाचेची मागणी करतात.ज्या लाभार्थ्यांनी लाचेची पूर्तता केली अशांचेच अनुदान वितरित केले जाते, बहुतांश लाभार्थ्यांचे घरकुलांचे बांधकाम होऊन हप्त्याची तारीख आलेली असताना सुद्धा त्यांना अनुदान वितरणामध्ये संबंधित अभियंता लाच न दिल्यासअडवणूक करतात असे निदर्शनास आल्याचे गंभीर आरोप सुद्धा पाटील यांनी निवेदनामध्ये केले आहे.*)
गरीब गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची आर्थिक अडवणूक करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी तथा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे घरकुल मंजूर असुन या घरकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात यावी ही बाब सुद्धा निवेदनामध्ये नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुलांचे मस्टर तातडीने काढण्यात यावे आणि पोहरादेवी येथील सरपंचांनी गट क्र.१६ मधील ज्या सहा मधील लाभार्थ्यांचे मंजूर जागेचे प्रस्ताव पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी शासनाकडे न पाठवल्यामुळे पात्र लाभार्थी शासनाच्या घरकुलापासून वंचित राहत असल्यामुळे ताबडतोब हे प्रस्ताव शासनाकडे न पाठविण्यात आल्यास दि.३ नोव्हेंबर रोजी पं. स. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदन कर्ते माजी पं. स. सदस्य विजय अनंत कुमार पाटील यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.
*पोहरादेवी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक १६ मधील ज्या सहा नागरिकांनी ई क्लास मधील जागा व्यापली आहे त्यांना ती जागा ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्पाकरिता वर्ग करण्याच्या विनंती चे पत्र संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे तथा विजय अनंत कुमार पाटील यांनी आंदोलन न करण्याची विनंती सुद्धा लेखी पत्र द्वारे केली आहे.*
फोटो ---
No comments:
Post a Comment