Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, November 7, 2025

तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक जिल्हा परिषद सर्कल मध्ये महिला उमेदवार ठोकणार शड्डू . लाडक्या अर्धांगिनींसाठी राजकीय पुढाऱ्यांचे निवडणूक डावपेच आखणे सुरू.*

मानोरा--(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)-
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून लाडकी बहीण योजना हा पर्वलीचा शब्द ठरलेला असून जिल्हा परिषदेमध्ये तालुक्यातील चार गट महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गज पुरुष उमेदवार आपल्या लाडक्या अर्धांगिनींना जिल्हा परिषद निवडणूक रणांगणात उतरवून जिल्हा परिषदेमध्ये दाखल होण्यासाठी हालचाली रणनीती आखत असल्याचे तालुक्यातील काही संभाव्य महिला उमेदवारांच्या नावावरून पुढे येत आहे. 
 जिल्हा परिषदेच्या आरक्षणाने सत्ताधारी महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांवर घरी बसण्याची वेळ आली तर तत्कालीन भाजपाच्या मागील वर्षी उमेदवार म्हणून पोहरादेवी तून विजयी झालेल्या स्वाती पाटील वंचितच्या कोंडोली पंचायत समिती गणातून मागील वेळेस छाया राठोड यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
   आरक्षणामुळे पोहरादेवी,आसोला, कुपटा, इंझोरी या चारही गटात रणरागिनींना पुन्हा संधी मिळणार आहे.इंझोरीच्या संभाव्य उमेदवार म्हणून बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील यांच्या अर्धांगिनी. माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ नाईक यांच्या अर्धांगिनी, कुपटा गटातुन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक उमेश ठाकरे,खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष महादेव ठाकरे बाजार समितीचे संचालक अभिजीत पाटील यासह माजी सरपंच दिलीप चव्हाण यांच्या अर्धांगिनी संभाव्य उमेदवार होऊ शकतात.
आसोला जिल्हा परिषद सर्कल मध्ये उमेदवाराची मोठी भाऊगर्दी होणार असल्याचे बोलल्या जात असून माजी पंचायत समिती सदस्य तथा विठोलीच्या सरपंच सौ.वनमालाबाई पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सौ.सपना देशमुख, दिनेश मोरे यांच्या अर्धांगिनी, यशवंत  इंगळे,बाजार समितीचे संचालक सुनील जामदार यांच्या अर्धांगिनी, परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रवर्तक मनोहर राठोड यांच्या अर्धांगिनी तथा पं.स.च्या माजी सदस्या सौ.छाया राठोड,पं.स.चे गटनेते गोपाल भोयर यांच्या अर्धांगिनी आदीं महीला उमेदवारांची शक्यता असून कोडोली चे माजी सरपंच देवराव पाटणकर हेही आपल्या अर्धांगिनींना भाजपाकडून लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गिरोली सर्कल मधून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविलेल्या अरविंद पाटील इंगोले यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यास झुंज देण्याची तयारी सौ.सीमा प्रकाश राठोड यांनी सुरू केलेली आहे.
आरक्षणामूळे महिला राज आल्याने उमेदवारांच्या भाऊगर्दीत दिग्गजांची डोकेदुखी वाढल्याने अनेक संभाव्य उमेदवार तळ्यात की मळ्यात करताना दिसत आहे.

फोटो:---

No comments:

Post a Comment

फॉलोअर