Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, November 7, 2025

बंजारा जमातीच्या मागासलेपणा बाबत निवृत न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग——-मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस


मुंबई,दि.७ (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
अनुसूचित जमाती संवर्गात बंजारा जमातीचा समाविष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या आदोलनाच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत बैठक बोलावून शिष्टमंडळाच्या निवेदनावर चर्चा केली.बंजारा समाजाचे मागासलेपण, सामाजिक व आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग अथवा समिती नेमली जाईल,असे आश्वासन दिले.
    सह्याद्री अतिथी सभागृहात बोलाविलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे,बंजारा समाजाचे धर्मगुरू आ.बाबुसिंग महाराज,आ.तुषार राठोड,आ. राजेश राठोड,आ.अर्जुन खोतकर,मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक,बंजारा समाजाचे संत व महंत,माजी खासदार हरीभाऊ राठोड,माजी आ.निलय नाईक, माजी मंत्री अमरसिंग तिलावत,विविध पक्ष, सामाजिक संघटनाचे प्रमुख उपस्थित होते.
   सुरूवातीला ना. संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे प्रश्न व गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या विविध प्रकारच्या आदोलनाबाबत माहिती दिली.त्यानंतर आभ्यास गठाने तयार केलेल्या निवेदनाचे मोहन राठोड यांनी वाचन केले.तसेच आ.बाबुसिंग महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.
निवेदनातील मुद्दे आभ्यासपूर्ण व पूरक कागदपत्रासह असल्याने समितीसाठी उपयुक्त राहील असे यांगून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाकडे अहवाल पाठवताना कुठलीही त्रुटी राहू नये. आयोगासमोर आपण आभ्यासपूर्ण मांडणी करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. निवेदनातील अन्य मुद्दे मान्य करण्यासारखे असल्याने कुठलीही अडचण येणार नाही,असे बंजारा समाजाच्या प्रतिनिधिंना  मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले.
  

No comments:

Post a Comment

फॉलोअर