Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, November 9, 2025

दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचे डोळेझाक ?. अपंग जनता दलाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात केले जाणार ठिय्या आंदोलन.



मानोरा:- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क).      वाशिम जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतानाही वाशिम जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या मात्र अनेक समस्या प्रलंबित असल्यामुळे या समस्यांच्या पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच दाद दिल्या जात नसल्याने व्यथीत होऊन अपंग जनता दलाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुधाकर काळे यांच्या नेतृत्वात १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात प्रलंबित मागण्या सोडविण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येण्याचा इशारा देणारा निवेदन जिल्हा प्रशासनाला संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार केंद्र आणि राज्य शासनाकडून दिव्यांगांच्या कल्याणाकरिता अनेक योजना अंमलात आणलेल्या आहे मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधव विकास वाटेपासून कोसो दूर असल्याचा आरोप अपंग जनता दलाच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे. 
आगामी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्यात यावी व यात टाळाटाळ करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. घरकुल वाटप करीत असताना दिव्यांगांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा. रोजगार हमीचे कामे देताना पात्र दिव्यांगांचा विशेष विचार करण्यात यावा.
व्यवसायासाठी स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीत दिव्यांगांसाठी भूखंड ठेवण्यात यावा.
दिव्यांग बांधवांच्या उपरोक्त जीवनावश्यक मागण्या व  बाबींच्या सोडवणुकीसाठी जिल्हास्तरावर तातडीने प्रयत्न करण्याच्या मागणीच्या व आंदोलनाचे निवेदन संघटनेचे जिल्हाप्रमुख जयकुमार कुंजल राठोड यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

फोटो --(प्रतिकात्मक) आंदोलनाचे

No comments:

Post a Comment

फॉलोअर