उमरी खुर्द (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) येथील कराटेपटू कु. आरुषी प्रमोद जाधव हिने गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या शोटोकॉन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप – 2025 या स्पर्धेत दोन पदके जिंकत गावचे नाव उज्ज्वल केले आहे. 12 ते 13 वयोगटात झालेल्या या स्पर्धेत आरुषीने एक सिल्वर (रौप्य) व एक ब्रॉन्झ (कांबेज) पदक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली.
आरुषी ही उमरी खुर्द येथील गवंडी काम करणारे प्रमोद जाधव यांची मुलगी असून विनोद जाधव मोठे बाबा आहेत आर्थिकदृष्ट्या साधारण परिस्थितीतून तिने केलेली ही यशस्वी मजल कौतुकास्पद आहे. परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर आरुषीने राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवत आई-वडील, कुटुंबीय व गावकऱ्यांचा मान वाढवला आहे.
गावातील गरीब कुटुंबातील मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पदके जिंकल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत असून गावांत तिच्या यशाचे विशेष कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment