Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, December 3, 2025

भुली येथे क्रिडांगण सुशोभीकरण व वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात


भुली,( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा). ३ डिसेंबर २०२५ रोजी (बुधवार) दुपारी १२.३० वाजता जि.प. शाळेच्या क्रिडांगण सुशोभीकरण तसेच वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन . परेशभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी   अशोक चव्हाण, पोलिस पाटील छायाताई डहाके,सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, अभ्यासिकेचे विद्यार्थी तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात श्री संत सेवालाल महाराज कर्मचारी बहुउद्देशीय संस्था यांना . परेश कृष्णराव राठोड यांनी दहा हजार रुपयांहून अधिक किमतीची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके प्रदान केली. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी मदत होणार आहे.

याप्रसंगी . अशोक चव्हाण, विजय पवार, माणिक चव्हाण, सौ. छायाताई डाहाके, रामधन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात . परेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाला भुली गाव तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर