मंगरूळपीर :-- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) सहकार विभागातील महाराष्ट्राचे माजी अप्पर निबंधक एड. बळीभाऊ राठोड यांनी आज राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कारंजा येथे भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी खासदार अनुभव धोत्रे, आमदार बाबूसिंग महाराज (राठोड) आ.श्रीमती सईताई प्रकाश डहाके, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, माजी मंत्री रणजीत पाटील, जिल्हा प्रभारी राजू पाटील राजे,भाजपा प्रदेश पदाधिकारी नरेंद्र गोलेच्छा, सुनील महाराज, जितेंद्र महाराज आणि पक्षाचे मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था या संघटनेच्या जडणघडणीमध्ये बळी राठोड यांचा मोलाचा वाटा असल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात कुशल संघटक म्हणून बळी राठोड यांचा नावलौकिक आहे.
बंजारा व विमुक्त भटके समाजासह ओबीसी समाजाला राजकीय सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शासकीय सेवेत असताना संघटनेच्या मार्फत बळी राठोड यांनी तब्बल ३० वर्षे उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
बळीभाऊ राठोड यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २०१४ मध्ये लढवली होती त्यामध्ये त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त झाली होती.
बळीभाऊ राठोड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्याने मंगरूळनाथ तालुक्यासह वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची बंजारा व्होट बँक मजबूत होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तथा भविष्यातील निवडणुकीमध्ये याचा पक्षाला मोठा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
आमदार श्याम खोडे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांनी बळीभाऊ राठोड यांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्यात मोलाची भूमिका पार पाडल्याने हा पक्ष प्रवेश सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
बॉक्स---
*बंजारा क्रांती दल या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा हरिभाऊ राठोड यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभा गाठली होती मात्र त्यांनी पक्षत्याग करून काँग्रेस पक्षाची वाट धरल्याने भारतीय जनता पक्षाकडे प्रशासकीय व संघटनेचा अनुभव असणारा बळीभाऊ राठोड यांच्यासारखा अभ्यासू आणि मोठा मासा कित्येक वर्षानंतर आता गळाला लागल्याने निश्चितच याचे भविष्यात दुहेरी फायदे पक्षाला व समाजाला सुद्धा मिळणार असल्याचे या प्रवेशाने निश्चित झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये बळीभाऊ राठोड*
No comments:
Post a Comment