Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, December 11, 2025

महिला व मुलींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम मानोरा येथे उत्साहात संपन्न


मानोरा ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
मानोरा शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय येथे आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा महिला व बालविकास विभाग, वाशिम यांच्या वतीने महिला व मुलींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी व तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका कु. एस. एन. बंड होत्या.
प्रमुख मार्गदर्शक व उपस्थित मान्यवर:
महादेव जऊळकर (जिल्हा संरक्षण अधिकारी, वाशिम)
रामदास वानखडे (तालुका संरक्षण अधिकारी, मानोरा)
निलिमा मॅडम (नीती आयोग समन्वयक, वाशिम)
अविनाश सोनोनो (जिल्हा समन्वयक, चाईल्ड लाईन वाशिम)
लक्ष्मी काळे (बाल संरक्षण अधिकारी, वाशिम)
अश्विनी बरडे (वन स्टॉप सेंटर, वाशिम)
ऍड. रेखाते मॅडम (विधिसेवा प्राधिकरण, मानोरा)
ऍड. अग्रवाल मॅडम
वैशाली राऊत व लक्ष्मी मोरे (टी.एल.ओ.)
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रविण आडुळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे शिक्षक:
दिनेश उपाध्ये, संदीप देशमुख, डी. एम. वाणी, कैलास टेकाडे, उल्हास चव्हाण, राजेश निघोट, सुरेश शेळके, रोशन राऊत, तुळशिराम कवाने, प्रविण आडुळे
तसेच —
कु. क्षमा ढोले, कु. सुनयना राठोड, कु. पौर्णिमा गचकेश्वरे, कु. स्वाती देशमुख — उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रविण आडुळे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान महिलांचे हक्क, संरक्षणाचे कायदे, शासकीय यंत्रणेची भूमिका, मदत आणि मार्गदर्शन केंद्रांची माहिती अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले. वातावरणात उत्साह आणि जागरूकतेचा संदेश पसरला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर