Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, December 16, 2025

पतंग उडवताना वीज यंत्रणेपासून राहा सावध! महावितरणचे आवाहन


अकोला , दि. १६ डिसेंबर २०२५(साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
 पतंग उडविण्याचा आनंद घ्या , परंतू पतंग उडवितांना आणि  कटलेल्या पतंगाचा पाठलाग करतांना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या , फिडर व वीज यंत्रणा पासून सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावे , असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्यावतीने  करण्यात आले आहे.

    शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकल्याने  ते काढण्यासाठी काठ्या , लोखंडी सळी किंवा गिरगोटचा वापर करण्यात येतो . अश्यावेळी  जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

       तसेच अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. तसेच मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .  त्यामुळे नागरिक व लहान मुलांनी वीज वाहिन्या,वीज यंत्रणा असलेल्या परिसराएैवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. 

*पालकांनी दक्ष रहावे :-*

पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग 
उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. वीज प्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करण्याबाबत आग्रही रहावे. पतंगामुळे अनेक दुदैवी घटना घडलेल्या आहेत , शिवाय यवतमाळ जिल्ह्यातील घटना ताजी आहे. त्यामुळे सावधगिरी हीच सुरक्षा आहे.
 
*धातूमिश्रीत मांजा धोकादायक :-*

बाजारामध्ये धातुमिश्रित मांजा मिळतो या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. तसेच या मांजामुळे अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
 

No comments:

Post a Comment

फॉलोअर