मंगरुळपीर ( हरीश चव्हाण )
शहरातील संस्कृती भवन व वसंत वाटिका शासकीय गोडाऊन जवळ आज हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या शपथविधी दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी प्रतिनिधी, जनप्रतिनिधी तसेच युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांनी भाषणाद्वारे सांगितले की वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात हरितक्रांतीची पायाभरणी झाली व कृषी क्षेत्रात राज्याने देशाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. ग्रामीण विकास, सिंचन व्यवस्था, शेतकरी कल्याण आणि कृषी परिवर्तनातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची उपस्थितांनी आठवण करून दिली. यावेळी त्यांना अभिवादन अर्पण करून शपथविधी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन रोहिदास गोवर्धन राठोड सर, गोर सिकवाडी संयोजक यांनी केले.
शेवटी सर्व उपस्थितांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचे स्मरण ठेवून ग्रामीण व कृषी विकासासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
उपस्थित मान्यवर:
गुलाबराव जाधव, रोहिदास गोवर्धन राठोड, प्रवेश राठोड सर, धीरज चव्हाण सर, हरीश चव्हाण, तांड्याचे नायक ज्ञानेश्वर राठोड, कारभारी शिवचंद चव्हाण सर, एके पवार सर, आय.टी सर, सुपसिंग राठोड सर, विजेश पवार सर, वसंत चव्हाण सर, साहेबराव पवार सर, प्राध्यापक इरफान भाई, एस. बी. चव्हाण सर, रमेश राठोड, अनिल चव्हाण, रामेश्वर राठोड, मांगूसिंग चव्हाण तसेच शहरातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment