मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानोरा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील भव्य कँडल रॅली काढण्यात आली. पदम लोक प्रतिष्ठान, मानोरा यांच्या वतीने गेली २० वर्षे ही रॅली भव्य स्वरूपात आयोजित केली जात असून यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि अनुशासनात कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव भगत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पदम लोक प्रतिष्ठानचे मुख्य आयोजक प्रविण आडुळे उपस्थित होते. कार्यक्रमास . बि. डी. मनवर (माजी शिक्षणाधिकारी), बाळासाहेब डेरे, डॉ. भिमपाल भगत, डॉ. विशाल शिरसाट, अनिल शिरसाट, सुभाष आडुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कँडल रॅलीनंतर धम्मपाल गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विशाल शिरसाट यांनी, तर सूत्रसंचालन पदम लोक प्रतिष्ठानचे मुख्य आयोजक प्रविण आडुळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील भाऊ शिरसाट, अनिल शिरसाट, मिलिंद मोरे, उमेश डेरे, शुभम आडुळे, जीवक वाघमारे, महेंद्र मनवर, रोशन मनवर, गणेश डेरे, विकी शिरसाट, गौतम मनवर, सूरज बडवे, प्रज्वल डेरे, दीपक शिरसाट, शेख पाशा, उमेश उमप, गोलू शिरसाट, संप्नील मोरे, सुशील कांबळे, योगेश ठोबरे, राहुल शिरसाट, अक्षय इंगोले, गणेश मस्के, सिद्धू शिकारे तसेच आडुळे सर मित्र मंडळ यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची माहिती व प्रसिद्धी डॉ. विशाल शिरसाट यांनी दिली.
No comments:
Post a Comment