Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, December 7, 2025

दिग्रसमध्ये नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार संजय देशमुख यांना निवेदन

दिग्रस | ०७ डिसेंबर २०२५( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)

दिग्रस येथे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. संजय देशमुख यांना नागरिकांच्या अडीअडचणी, योजना लाभातील विलंब आणि स्थानिक पायाभूत सुविधांवरील समस्या सोडविण्याच्या मागण्यांसाठी सविस्तर निवेदन देण्यात आले. हे निवेदन माजी पंचायत समिती सदस्य श्री. विजय अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.

निवेदनात मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता न मिळालेल्या सुमारे १००० लाभार्थ्यांची समस्या, PFMS प्रणालीवरील आधार व बँक खात्यांच्या व्हेरिफिकेशनमध्ये होणारा विलंब, ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे योजना रखडणे, मानोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसणे, पोहरादेवी तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या पंचाळा फाटा–पोहरादेवी रस्त्याचे रुंदीकरण, तसेच पोहरादेवी येथील PRASHAD योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने करण्यासंबंधी मागणी यांचा समावेश होता.

याशिवाय, पोहरादेवी येथे मंजूर झालेली जल जीवन मिशनची 5.53 कोटींची पाणीपुरवठा योजना निधीअभावी अर्धवट, नगारा भवनाच्या दर्शनासाठी आकारले जाणारे २०० रुपयांचे शुल्क रद्द करण्याची मागणी, तसेच ई-क्लास जमिनीवर दशकांपासून राहणाऱ्या गरीब कुटुंबांना घरकुल योजना लागू करण्यासाठी आवश्यक नियमबद्धीकरण करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली.

या सर्व मागण्यांचा सविस्तर आढावा घेऊन खासदार संजय देशमुख यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.

निवेदन देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अरविंद पाटील, विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गावोगावचे सरपंच, माजी सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर