यवतमाळ,दि.०४ जानेवारी २०२५;( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरण यवतमाळ आणि पुसद विभागात मंगळवार (दि.०६) आणि बुधवार (दि.०७) रोजी उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारी असलेल्या सौरकृषीपंपधारक वीजग्राहकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
मंगळवार दिनांक ६ जानेवारी यवतमाळ विभागांतर्गत येणाऱ्या बाबुळगाव उपविभागीय कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ आणि कळंब उपविभागीय कार्यालयात दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी पुसद विभागाअंतर्गत सकाळी १० ते २ वाजेपर्यंत पुसद शहर आणि पुसद ग्रामीण उपविभागीय कार्यालयात आणि दुपारी ३ ते ६ वाजेदरम्यान महागाव उपविभागात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक ७ जानेवारीला सकाळी १० ते १ वाजेदरम्यान पुसदविभागाअंतर्गत उमरखेड आणि दुपारी ३ ते ६ वाजता ढाणकी उपविभागात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यवतमाळ विभागाअंतर्गत सकाळी १० ते १ वाजेदरम्यान यवतमाळ आणि दुपारी ३ ते ६ वाजता राळेगाव उपविभागीय कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंते पुरूषोत्तम चव्हाण आणि जनार्दन चव्हाण यांच्या पुढाकाराने पार पडत असलेल्या या मेळाव्यात शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने महावितरणने केले आहे.
No comments:
Post a Comment