सोयजना: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
सुखिया सब संसार है जो खावत है और सोवत है, दुःखिया दास कबीर है, जो जागत है और रोवत है" हे विधान अखिल भारतीय तिसरे गोर बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड यांनी यांनी सोयजना येथे जगदंबा मंदिराच्या परिसरात आयोजित एका प्रबोधनात्मक कार्यक्रमात व्यक्त केले." नामा बंजारा हे उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आपल्या परिसरातील दिन दलित गोर गरिबांच्या समस्या बघून संत कबीरप्रमाणे आजही जागत है, झगडत आहे, संघर्ष करीत आहे आणि रोहत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात "चळवळीतील ढान्या वाघ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नामा बंजारा यांच्या पाठीमागे उभे राहन्यातच मानोरा तालुक्याचे हित आहे असे सडेतोड़ विधान डॉ. प्रकाश राठोड यांनी केले.मानोरा तालुक्यातील सोयजना येथे प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ.प्रकाश राठोड नागपुर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते. तळप सर्कल मधील रस्ते, गटारनाल्या, पुल, बंद होत जाणाऱ्या शाळा, डबघाइस आलेली शिक्षण व्यवस्था, अशुद्ध पिण्याचे पानी आणि त्यापासुन होणारे किडनी सारखे जीवघेणे आजार, गरीबी, शासनाकडून येणाऱ्या परंतु गोरगरीब जनतेपर्यंत न पोहोचनाऱ्या योजना, जाती पातीचे राजकारण, अज्ञान या सर्वच बाबीवर डॉ. राठोड यांनी कडाडुन प्रहार करीत सर्वांवरचे उत्तम उपाय म्हणजे मानवतावादावर फुललेले सर्वांग सुंदर फुल म्हणजे नामा बंजारा होय, त्यामुळे या चळवळीमध्ये स्वताला ज़ोकुन देऊन कार्य करणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्राला ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेल्या नामा बंजारा यांना आपण या तलप सर्कलमध्ये संधी दिल्यास आपल्या बऱ्याच समस्या कमी होतील असे आश्वासन डॉ. राठोड यांनी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने गावकऱ्यांना दिले. याप्रसंगी डॉक्टर विठ्ठल घाडगे,मिसाल, बंडू कोल्हे, सुनील चव्हाण, धनराज चव्हाण, अश्विन चव्हाण, पंकज चव्हाण, विलास राठोड, देविदास आडे शंकर कोल्हे तसेच आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा नायक कारभारी आवर्जून उपस्थित होते.
No comments:
Post a Comment