मानोरा :( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील महान तपस्वी संत श्री. काशिनाथ बाबा संस्थान श्रीक्षेत्र अमरगड वाईगौळ येथे बाबाजींच्या ६० व्या संजीवन सोहळा निमित्त मंदीर संस्थानच्यावतीने आयोजीत महाप्रसाद कार्यक्रमात दि.१५ जानेवारी रोजी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बाबाजींच्या जयघोषाने अमरगड वाईगोळ नगरी दुमदुमून गेली होती.
श्रीक्षेत्र अमरगड वाईगोळ येथे महान तपस्वी काशिनाथ बाबा संस्थानवर बाबाजींच्या ६० व्या संजीवन सोहळ्यानिमित श्रीमद् भागवत कथेचे सप्ताहभर आयोजन ह. भ. प. श्री दिपक शास्त्री महाराज यांच्या अमृत वाणीतून पार पडला. श्रीमद् कथा प्रवचन व दैनंदीन विविध धार्मिक कार्यक्रमाला यवतमाळ आणि वाशिम जिल्हयातील भाविक भक्तांची गुरुवारी बाबाजींच्या समाधी सोहळा भूमीवर नतमस्तक होत आशीर्वाद आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.
No comments:
Post a Comment