Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, January 14, 2026

भव्य बक्षिसांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा; सहभागी होण्याचे आवाहन



दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क).               डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पोर्ट्स अकादमी, दिग्रस यांच्या वतीने जिल्हास्तरीय खो-खो चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही दोन दिवसीय स्पर्धा शनिवार, १७ व रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी येथील मॉनिटर क्लब इंग्लिश मिडीयम स्कूल जुना दारव्हा रोड येथे होणार आहे.

स्पर्धा मुली व मुले अशा दोन स्वतंत्र गटांत होणार असून दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या संघास १० हजार रुपये तर उपविजेत्या संघास ५ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष व दिग्रस नगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य डॉ. संजय बंग यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी खुली असून, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेचे संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रवेश फी ५०० रुपये प्रति संघ अशी ठेवण्यात आली आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी
आसिफ काजी – ९११२७७४१०९
सादिक गारवे – ७४४७२०१८७२
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जयवंत सास्तिकर, फैजान शेख आणि फारुक चव्हाण यांनी केले आहे. स्पर्धा आयोजनात दिग्रस तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना सहकार्य करीत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर