मंगरूळपीर:-- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) तालुक्यातील कळंबा बोडखे या गावांमध्ये अरूण्येश्वर ऋषी महाराजांच्या यात्रोत्सवा निमित्त प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सामाजिक उद्बोधनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे माजी अप्पर निबंधक बळीभाऊ राठोड यांनी उपस्थित जनसमुदायासमोर उपरोक्त मत व्यक्त करून लोकशाहीमध्ये मतदार आता अधिक सजग असने गरजेचे असल्याची बाब अधोरेखित केली.
कळंबा बोडखे या गावाचे आराध्य दैवत अरूणेश्वर ऋषी महाराज संस्थानच्या यात्रेनिमित्त धानोरा, शेगी,सावरगांव कान्होबा, दस्तापुर, मसोला, कोळंबी, साळंबी आदी गावातील श्रद्धाळू व नागरिक मोठ्या संख्येने प्रसिद्ध समाज सुधारक व सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधन पर कार्यक्रमाला काल रात्री जातीने हजर होते.
सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीभाऊ राठोड आणि प्रवीण चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले होते.
कळंबा बोडखे या व आजूबाजूच्या संताच्या भूमितील नागरिकांनी संतांच्या शिकवणुकीचा उपयोग आपला संसार, समाज आणि देश सुदृढ करण्यासाठी करण्याचे आवाहन उपस्थित श्रद्धांळूंना संबोधित करताना राठोड यांनी केले.
भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुकींमध्ये बंदुकीच्या गोळी पेक्षा अधिक ताकदवान असलेल्या बॅलेट (मताचा) उपयोग करून आदर्श लोकप्रतिनिधी निवडण्याचे आणि भारतीय लोकशाहीला ताकद देण्याचे आवाहन सुद्धा बळी भाऊ राठोड यांच्या वतीने करण्यात आले.
सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे स्वागत कळंबा वाशीयांच्या वतीने आयोजक प्रवीण चव्हाण सह गणमान्यांच्या वतीने करण्यात आले.
फोटो:---
No comments:
Post a Comment