Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, January 23, 2026

कृषी, औद्योगिक क्रांतीच्या प्रनेत्यांनी शिक्षण घेतलेली शाळा इमारत टाकत आहे कात. विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश.

मानोरा :-- ( साप्ता.दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या विठोली ह्या गावी राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळून राज्याला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला त्या कै. वसंतराव नाईक यांनी ज्या शाळा इमारतीमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले ती भग्नावस्थेत पोहोचलेली इमारत दुरुस्त (डागडुजी) करण्यात यावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन केलेल्या पाठपुराव्याचा आवाज जिल्हा प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचून या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात असल्याने ही इमारत आता कात टाकीत असल्याचे पुढे येत आहे.
संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत ही शाळा इमारत आणि प्रांगणासाठी मंजूर करण्यात आलेल्या विस लक्ष रुपयातून या शाळेची डागडूजी व सुशोभीकरण करण्यात येऊन माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिंना उजाळा देण्याचे काम करण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आठवण तालुका जिल्ह्यातील नागरिकांच्या स्मरणात राहावी यासाठी भग्न अवस्थेत पोहोचलेली ही इमारत वारसा म्हणून जपण्यात येणे संदर्भात अखिल भारतीय तांडा सुधार समिती,गोरसेना, परिवर्तन शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस कृष्णकुमार राठोड, पं. स.च्या माजी सदस्या सौ.छाया मनोहर राठोड आदींनी सातत्याने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. 
सरकारमधील राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक त्यांच्या सौभाग्यवती, पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांनी या शाळा इमारतीला गतवर्षी भेट देऊन शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन उपरोक्त सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींना दिले होते.
विठोली येथील प्राथमिक शाळेची ही इमारत आता डागडुजीमुळे चैतन्यावस्थेकडे जात असून माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिगंधांचा दरवळ सुशोभीकरण सुरू असलेल्या या इमारतीमुळे पसरणार आहे. 

फोटो ---

No comments:

Post a Comment

फॉलोअर