मानोरा :--- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील ईंझोरी परसरातील असंख्य पात्र घरकुल धारकांनी लोकांकडून कर्ज,उधारी घेऊन घरांचे बांधकाम करूनही शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाचे हप्ते थकल्याने पाठपुरावा करीत थकलेल्या नागरिक व शिवसेना उबाठा अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आज भीक मांगो आंदोलन करून शासन व प्रशासनाचा निषेध केला.
केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध नाव असलेल्या व अनुदान मिळत असलेल्या घरकुल योजना ईंझैरी पंचक्रोशीसह तालुक्यातील इतर पाच महसूल मंडळातील शेकडो नागरिकांना मंजूर झालेले आहे.
घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता मिळाल्याबरोबर अनेक नागरिकांनी दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या आहेत खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन घरकुलांचे बांधकाम केलेले आहे अशांना व्याजाची पैसे परत कसे करावे अशी चिंता घरकुलाचे हप्ते थकल्याने सतावत असल्याची बाब या महिन्याच्या १३ तारखेला लेखी निवेदनासह निदर्शनास आणून देण्यात आली होती यावर कुठलीही कारवाई पंचायत प्रशासनाकडून करण्यात आलेली नसल्याने ईंझोरी परिसरातील नागरिकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत पंचायत समिती कार्यालय प्रांगणात शासन व प्रशासनाच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.
घरकुल लाभार्थी असलेले मात्र ज्यांची आर्थिक पत नाही अशा अनेक नागरिकांना हप्ते थकल्यामुळे उघड्यावर राहण्याची पाळी थंडीच्या दिवसात आलेली असल्यामुळे तातडीने थकलेले हप्ते अदा करण्याची आग्रही विनंती इंझोरी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली असून प्रशासनाने दखल न घेतल्यास उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.
No comments:
Post a Comment