मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
तालुक्यातील कारपा येथे नुकतीच मराठी तालुका पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार आनंद खुळे व इंद्रगोल राठोड यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
मा जिजाऊंना अभिवादन आणि सत्कार सोहळा
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा संघाचे तालुका कार्यवाहक अरुण दादा भालदान यांनी तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे आणि ज्येष्ठ पत्रकार जगदीश राठोड यांचा 'ग्रामगीता' देऊन विशेष सत्कार केला.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार जगदीश राठोड, देविदास पारसकर आणि सुदाम तायडे यांची लाभली होती.
कार्यक्रमात विचार मांडणारे वक्ते जगदीश राठोड, बळवंत भगत, राजेंद्र दीक्षित, प्रवीण ठाकरे, सुदाम तायडे,
वक्त्यांनी पत्रकारितेतील मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नेटके संचालन प्रवीण अडुळे यांनी केले. सभेच्या समारोपानंतर उपस्थित पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
उपस्थित पत्रकार व मान्यवर
या प्रसंगी संतोष कांबळे, बंडू राठोड,देविदास पारसकर, बळवंत भगत, सुदाम तायडे, पंडित राठोड, राजेंद्र दीक्षित, मनोज आडे, अफसर शाह, प्रमोद आडे, अशोक रत्नपारखी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment