दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी आसोला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रांतीसूर्य काशिनाथ नायक यांच्या जयंतीनिमित्त चेतना दिवस व बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य काशिनाथ नायक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार विविध खाद्यपदार्थांचे छोटे-छोटे स्टॉल उभारले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदात चेतना दिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना क्रांतीसूर्य काशिनाथ नायक यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या सामाजिक व क्रांतिकारक विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमाला आसोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. वसंतरावजी राठोड, सरपंच सौ. निकिता राठोड, शाळा समिती अध्यक्ष दीपकभाऊ राठोड, माजी ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ राठोड, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडीच्या शिक्षिका व मदतनीस, गावातील युवक मंडळ तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि संघभावना वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.
No comments:
Post a Comment